Posts

संगणकाचा शोध आणि महान शास्त्रज्ञ कोनराड झुसे

Image
स्त्रोत:विकीपिडिया संगणक ही आज एकविसाव्या शतकातील एक महत्वाची गरजेची वस्तू आहे. अगदी घरापासून ते मोठ्या औद्योगिक आस्थापनापर्यन्त याचा उपयोग होत आहे. संगणकाची निर्मिती ही काही एका टप्प्यात झाली नाही,  त्याला बराच वेळ लागला. बहुतेक शोध हे पहिल्या आणि दुसरया महायुद्धाच्या काळातच लागले. यावेळी शास्त्रज्ञांना सुद्धा अडथळे पार करावे लागले. वित्तपुरवठा न होणे किंव्हा जागतिक युद्धजन्य परिस्थिती यामूळे नवीन संशोधनामध्ये बरेच अडथळे येत होते.  अशाच वेळी कोनराड झुसे या जर्मन शास्त्रज्ञाने संगणक निर्मिती साठी संशोधन चालू केले. हे एक जर्मन सिव्हिल इंजिनियर, संगणक वैज्ञानिक आणि उद्योजक होते. जगातील पहिला प्रोग्राम करण्यायोग्य संगणक हा त्यांनीच बनविला. The functional program-controlled Turing-complete Z3 हा  त्यांनी 3 मे १९४१ रोजी कार्यरत केला. स्त्रोत:विकीपिडिया: Z1 संगणकाची प्रतिकृती, जी आता बर्लिन येथे संग्रहालयामध्ये आहे. विशेष नोंद करण्यासारखी बाब म्हणजे त्यांनी S2 प्रक्रिया नियंत्रण (Process Control) संगणकाची निर्मिती केली. १९४१ मध्ये त्यांनी Z4 ह्या व्यावसायिक संगणकाची निर्...

गोष्ट एका 2५६ वर्षे जगलेल्या माणसाची….

Image
स्त्रोत:विकीपिडिया चीन आपल्या वैविध्य पूर्ण निसर्ग, इतिहास, कला, मार्शल आर्ट आणि रहस्यमय औषधी वनस्पतींसाठी प्रसिद्ध आहे.आम्ही इतिहासामध्ये घडलेल्या अशाच एका आश्चर्यजनक बातमीबद्दल सांगणार आहोत,जी बातमी आहे चीन मधील, आणि एका २५६ वर्षे जगलेल्या माणसाची.  ही  कथा तुम्हाला काल्पनिक वाटेल, पण ही एक सत्यकथा आहे. आपल्या माहिती प्रमाणे तर सामान्य माणसाचे आयुष्य आहे ७५  ते ८५ वर्ष, आणि कोण जास्तीच जास्त जगला तर १०० वर्ष. ली चिंग युएन हा माणूस २५६ वर्ष जगला होता. यांचा जन्म इ.स. १७३७ रोजी सिचुआन या चीन मधील दक्षिण प्रांतामध्ये झाला, पण काही विवादित नोंदीमध्ये तो १६७७ असा आहे. निश्चित जन्मतारीखेविषयी सबळ पुरावा नसल्यामुळे इंटरनेट वर मात्र ही एक अफवाच आहे, पण यांच्याविषयी असलेल्या काही नोंदी डावलून चालणार नाही. औषधी वनस्पतीमध्ये जाणकार असलेल्या ली चिंग युएन यांनी आपले आयुष्य पर्वतामध्ये औषधे गोळा करण्यामध्ये घालविले आणि ते या विषयामध्ये निष्णान्त होते. ची कुंग या चीनमधील शेकडो वर्षापूर्वीच्या योगा मध्ये पण त्यांनी अभ्यास केला होता. गांसू, शांक्सी, वियतनाम, थाईलैंड, मंचूरिया, आणि ति...

अ‍ॅस्ट्रोसॅट या भारतीय उपग्रहाने शोधून काढले एक्सट्रीम अल्ट्राव्हायोलेट (यूव्ही) लाइटचे अस्तित्व

Image
पृथ्वीवरून जवळजवळ 9.30 अब्ज प्रकाश वर्षांच्या अंतरावर असलेल्या आणखी एका आकाशगंगेमधून बाहेर पडणार्‍या एक्सट्रीम अल्ट्राव्हायोलेट (यूव्ही) लाइटचे अस्तित्व अ‍ॅस्ट्रोसॅट या भारतीय उपग्रहाने शोधून काढले आहे. अ‍ॅस्ट्रोसॅट हा भारताचा पहिला मल्टी-वेव्हलेन्थ लांबीचा उपग्रह आहे. अंतराळ विज्ञान आणि अवकाश भौतिकशास्त्रासाठी पुणे येथील आंतर-विद्यापीठ केंद्र (इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अ‍ॅस्ट्रोनॉमी अँड अ‍ॅस्ट्रोफिजिक्स) (Inter-University Centre for Astronomy and Astrophysics, (IUCAA) या संस्थेने सोमवारी ही माहिती दिली. पुण्यातील (IUCAA) आयुका च्या शास्त्रज्ञांनी लावलेला हा अतिशय महत्वाचा शोध मानला जात आहे. या खगोलशास्त्रज्ञांच्या पथकाचे अध्यक्ष आयुकाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. कनक साहा असून भारत, फ्रान्स, स्वित्झर्लंड, अमेरिका, जपान आणि नेदरलँड्स या देशातील शास्त्रज्ञ या प्रयोगावर काम करीत आहेत. यापूर्वी २०१६ मध्ये असाच प्रयोग झाला होता. अ‍ॅस्ट्रोसॅट च्या माधमातून या यूव्ही लाइट चे अस्तित्व आढळून आले होते, आणि ते २८ तास याच्या संपर्कात होते. पुढील दोन वर्षे यावर संशोधन चालले.वास्तविक, या प्रकारच...

५० वर्षानंतर पुन्हा दिसला हत्तीसारखी सोंड असणारा हा प्राणी.....

Image
प्रचंड झालेली वृक्षतोड आणि पर्यावरणाचा झालेला ऱ्हास यामूळे विसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत अनेक प्रजाती लुप्त झाल्या, किंव्हा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर झालेल्या औद्योगिकरणामुळे नवीन शहरे वसविली गेली, आणि सहाजिकच जंगले तोडून अतिक्रमण करण्यात आले. प्रदूषण आणि त्यामुळे वाढणारे जागतिक तापमान काही प्रजातीच्या लुप्त होण्यास कारणीभूत ठरले. पण वैज्ञानिक अशा विलुप्त होत चाललेल्या प्रजातीना कसे वाचविले पाहिजे यावर संशोधन करीत असून त्यासाठी प्रयन्त देखील चालू आहेत. अशाच एका विलुप्त होत चाललेल्या प्रजातीचा शोध आफ्रीकेमध्ये जिबूती या प्रदेशामध्ये लागला आहे. ५० वर्षापूर्वी या परीसरात Elephant Shrews (एलफन्ट श्रॉ) हा प्राणी आढळायचा. काहीसा उंदरासारखा दिसणारा पण हत्तीसारखी सोंड असणारा हा प्राणी हत्तीच्या कुळात मोडतो. म्हणून याला Elephant Shrews (एलफन्ट श्रॉ) म्हटले जाते. १९८७ मध्ये या प्राण्याचे जिबूतीच्या परिसरामध्ये दर्शन झाले होते. उंदरासारखा हा हत्ती (Sengis )सेन्गिस म्हणूनही ओळखला जातो. हे Aardvarks ( आफ्रीकेमध्ये आढळणारे डुक्करासारखे प्राणी) आणि हत्ती आणि मैनेटी या जै...

'फ्लाइंग कार'; स्कायड्राईव्ह कंपनीची, एका व्यक्तीसह यशस्वी चाचणी.........

Image
आकाशात तुम्ही जर कार उडविण्याचे स्वप्न पाहत असाल, तर ते स्वप्न न राहता आता प्रत्यक्षात उतरणार आहे. अनेक वर्षापासून यावर संशोधन चालू होते, आणि याचा पहिला सफलपूर्वक प्रयोग जपान येथे झाला आहे. जपानच्या स्कायड्राईव्ह कंपनीने, एका व्यक्तीसह यशस्वी चाचणी उड्डाण केले आहे. शुक्रवारी पत्रकारांना यासंदर्भात विडिओ दाखविण्यात आला, प्रोपेलर्ससह चपळ मोटरसायकलसारखे दिसणारे एक विमान जमिनीपासून काही फूट (1-2 मीटर) वर चालविण्यात आले. ४ मिनिटे बंद जाळीमध्ये याचा प्रयोग करण्यात आला. स्कायड्राईव्ह प्रयत्नाचे प्रमुख असलेले ओमोहिरो फुकुझावा म्हणाले की, २०२३ पर्यंत "फ्लाइंग कार" चे स्वप्न प्रत्यक्षात उतरू शकते. ते सुरक्षित करणे हे पण तितकेच गरजेचे आणि महत्वाचे आहे. आतापर्यत जगात १०० पेक्षा जास्त फ्लाइंग कार चे प्रयत्न चालू आहेत, पण स्कायड्राईव्हचा हा एका माणसाला बसून उडण्याचा प्रयन्त सफल झालेला आहे. ईव्हीटीओएल किंवा "इलेक्ट्रिक वर्टिकल टेकऑफ आणि लँडिंग" यासारखी वाहने पॉईंट-टू-पॉईंट वैयक्तिक प्रवासासाठी योग्य आहेत. कमी जागेत ही "फ्लाइंग कार" उड्डाण आणि उतरू शकते. शहरातील वाह...

जगातील सर्वात मोठी आणि प्रसिद्ध धरणे

Image
थ्री गॉर्जेस धरण  हे धरण चीन मध्ये असून हुबेई प्रांतांत यागंस्ते नदीवर स्थित आहे. हे धरण बांधताना जगातील अत्युच्च अशा  तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. हा चीन मधील सर्वात मोठा प्रकल्प असून इथे २२५०० मेगावॉट वीज निर्माण करण्याची क्षमता आहे. 22.5 बिलीयन डॉलर हे धरण बांधण्यासाठी खर्च आला. इटापी धरण हे धरण ब्राझील-पराग्वे सीमेवर असून हे जगातील दुसर्या क्रमांकाचे धरण आहे. १४००० मेगावॉट वीज निर्माण करण्याची या धरणाची क्षमता आहे. १९८४ मध्ये अधिकृत पणे हे धरण चालू करण्यात आले. 2016 मध्ये या धरणातून विश्वविक्रमी १०३,०९८, ३६६   मेगावॉट वीज निर्मिती झाली होती. झिलुडू धरण: हे चीन मधील दोन क्रमांकाचे धरण असून जलविद्युत निर्माण करण्यात जगात तिसरा क्रमांक लागतो. ९३७ फूट उंचीच्या (२५५.५) मीटर उंचीच्या या धरणाचा उंचीच्या बाबतीत जगात चौथा क्रमांक लागतो. युनान प्रांतातील जिन्शा नदीवर वसलेल्या या धरणातून १६८६० मेगावॉट वीज निर्मिती होते. गुरी धरण: हे व्हेनेझुएला येथे स्थित असून जगातील प्रसिद्ध अशा धरणापैकी आहे. सायमन बोलिवार धरण म्हणूनही ओळखले जाणारे, गुरी धरण व्हेनेझुएलाच्या बोलिव्हार राज्यात...

आता चंद्रावरही उगवू शकते मुळ्यासारखी भाजी...

Image
स्त्रोत:नासा चंद्राकडे मानव नेहमीच एक आश्चर्य म्हणून पाहत आला आहे, आणि भविष्यात तिथे मानव वस्ती करू शकतो का ,याबद्दल नासा सारखी संस्था संशोधन पण करीत आहे.  १६ जुलै १९६९ च्या मोहिमेमध्ये  नील आर्मस्ट्रॉंग सारखे अंतराळवीर चंद्रावर पण पोहोचले , आणि अंतराळ क्षेत्रात मानवाने एक प्रगतीचे पाऊल टाकले. भविष्यात माणसाने चंद्रावर वस्ती केली, तर तो तिथे आपले अन्न पिकवू शकतो का ? याबद्दल महत्वाचे संशोधन नासा मध्ये चालू आहे, आणि त्यांना बऱ्यापैकी यश देखील मिळाले. असाच प्रयत्न नासा संशोधक मॅक्स कोलमन यांनी केला. सद्या कोविड १९ महामारीचे संकट असल्यामुळे बहुतेक देशात लॉकडाऊनसारखी स्थिती आहे. अमेरिकेसारख्या देशात पण असेच संकट असताना, आणि काही शहरांमध्ये लॉकडाऊन असल्यामुळे त्यांनी हा प्रयोग घरीच करण्यास पसंत केला. चंद्रावर वातावरण नाही, त्यामुळे तिथे प्राणी किंव्हा वनस्पती जिवंत राहू शकत नाही, आणि हेच एक मोठे आव्हान आहे. मॅक्स कोलमन यांचा प्रयोग हा पुढील संशोधनाला दिशा देणारा आहे.  कोलमन यांनी यासाठी वाळवंटातील रेती, टीशू पेपर, मुळा (जी आपण भाजीसाठी वापरतो) यांचा वापर प्रयोग करण्यासाठी केला...