अॅस्ट्रोसॅट या भारतीय उपग्रहाने शोधून काढले एक्सट्रीम अल्ट्राव्हायोलेट (यूव्ही) लाइटचे अस्तित्व
पृथ्वीवरून जवळजवळ 9.30 अब्ज प्रकाश वर्षांच्या अंतरावर असलेल्या आणखी एका आकाशगंगेमधून बाहेर पडणार्या एक्सट्रीम अल्ट्राव्हायोलेट (यूव्ही) लाइटचे अस्तित्व अॅस्ट्रोसॅट या भारतीय उपग्रहाने शोधून काढले आहे. अॅस्ट्रोसॅट हा भारताचा पहिला मल्टी-वेव्हलेन्थ लांबीचा उपग्रह आहे. अंतराळ विज्ञान आणि अवकाश भौतिकशास्त्रासाठी पुणे येथील आंतर-विद्यापीठ केंद्र (इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अॅस्ट्रोनॉमी अँड अॅस्ट्रोफिजिक्स) (Inter-University Centre for Astronomy and Astrophysics, (IUCAA) या संस्थेने सोमवारी ही माहिती दिली. पुण्यातील (IUCAA) आयुका च्या शास्त्रज्ञांनी लावलेला हा अतिशय महत्वाचा शोध मानला जात आहे. या खगोलशास्त्रज्ञांच्या पथकाचे अध्यक्ष आयुकाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. कनक साहा असून भारत, फ्रान्स, स्वित्झर्लंड, अमेरिका, जपान आणि नेदरलँड्स या देशातील शास्त्रज्ञ या प्रयोगावर काम करीत आहेत. यापूर्वी २०१६ मध्ये असाच प्रयोग झाला होता. अॅस्ट्रोसॅट च्या माधमातून या यूव्ही लाइट चे अस्तित्व आढळून आले होते, आणि ते २८ तास याच्या संपर्कात होते. पुढील दोन वर्षे यावर संशोधन चालले.वास्तविक, या प्रकारच...