५० वर्षानंतर पुन्हा दिसला हत्तीसारखी सोंड असणारा हा प्राणी.....
प्रचंड झालेली वृक्षतोड आणि पर्यावरणाचा झालेला ऱ्हास यामूळे विसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत अनेक प्रजाती लुप्त झाल्या, किंव्हा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर झालेल्या औद्योगिकरणामुळे नवीन शहरे वसविली गेली, आणि सहाजिकच जंगले तोडून अतिक्रमण करण्यात आले. प्रदूषण आणि त्यामुळे वाढणारे जागतिक तापमान काही प्रजातीच्या लुप्त होण्यास कारणीभूत ठरले. पण वैज्ञानिक अशा विलुप्त होत चाललेल्या प्रजातीना कसे वाचविले पाहिजे यावर संशोधन करीत असून त्यासाठी प्रयन्त देखील चालू आहेत. अशाच एका विलुप्त होत चाललेल्या प्रजातीचा शोध आफ्रीकेमध्ये जिबूती या प्रदेशामध्ये लागला आहे. ५० वर्षापूर्वी या परीसरात Elephant Shrews (एलफन्ट श्रॉ) हा प्राणी आढळायचा. काहीसा उंदरासारखा दिसणारा पण हत्तीसारखी सोंड असणारा हा प्राणी हत्तीच्या कुळात मोडतो. म्हणून याला Elephant Shrews (एलफन्ट श्रॉ) म्हटले जाते. १९८७ मध्ये या प्राण्याचे जिबूतीच्या परिसरामध्ये दर्शन झाले होते. उंदरासारखा हा हत्ती (Sengis )सेन्गिस म्हणूनही ओळखला जातो. हे Aardvarks ( आफ्रीकेमध्ये आढळणारे डुक्करासारखे प्राणी) आणि हत्ती आणि मैनेटी या जै...