संगणकाचा शोध आणि महान शास्त्रज्ञ कोनराड झुसे

स्त्रोत:विकीपिडिया


संगणक ही आज एकविसाव्या शतकातील एक महत्वाची गरजेची वस्तू आहे. अगदी घरापासून ते मोठ्या औद्योगिक आस्थापनापर्यन्त याचा उपयोग होत आहे. संगणकाची निर्मिती ही काही एका टप्प्यात झाली नाही,  त्याला बराच वेळ लागला. बहुतेक शोध हे पहिल्या आणि दुसरया महायुद्धाच्या काळातच लागले. यावेळी शास्त्रज्ञांना सुद्धा अडथळे पार करावे लागले. वित्तपुरवठा न होणे किंव्हा जागतिक युद्धजन्य परिस्थिती यामूळे नवीन संशोधनामध्ये बरेच अडथळे येत होते. 


अशाच वेळी कोनराड झुसे या जर्मन शास्त्रज्ञाने संगणक निर्मिती साठी संशोधन चालू केले. हे एक जर्मन सिव्हिल इंजिनियर, संगणक वैज्ञानिक आणि उद्योजक होते. जगातील पहिला प्रोग्राम करण्यायोग्य संगणक हा त्यांनीच बनविला. The functional program-controlled Turing-complete Z3 हा  त्यांनी 3 मे १९४१ रोजी कार्यरत केला.


स्त्रोत:विकीपिडिया: Z1 संगणकाची प्रतिकृती, जी आता बर्लिन येथे संग्रहालयामध्ये आहे.


विशेष नोंद करण्यासारखी बाब म्हणजे त्यांनी S2 प्रक्रिया नियंत्रण (Process Control) संगणकाची निर्मिती केली. १९४१ मध्ये त्यांनी Z4 ह्या व्यावसायिक संगणकाची निर्मिती केली. १९४३ ते १९४५ मध्ये त्यांनी प्रथम उच्च स्तरीय प्रोग्रामिंग भाषा, प्लॅनकलॅक डिझाइन केली.


१९३६ मध्ये झुसे यांनी Z1 य संगणकाची निर्मिती केली. पण त्याच वेळी दुसरे महायुद्ध चालू असल्यामुळे परिस्थिती गंभीर झाली. बॉम्बवर्षावात तो नष्ट झाला. पण त्यांनी हिंमत न हरता Z2 संगणकाची निर्मिती केली, ते वर्षं होत १९४०.  त्यांनी पुढे संशोधन तसेच चालू ठेवले आणि Z3 या अतिशय कार्यक्षम अशा पुढील आवृत्तीच्या संगणकाची निर्मिती केली.  यासाठी त्यांना जर्मन संस्थेची मदत मिळाली होती, पण हा ही संगणक युद्धाच्या धामधुमीत नष्ट झाला. त्यांनी न डगमगता पुढचे संशोधन चालू ठेवले, आणि Z4 या पुढील आधुनिक आवृत्तीच्या संगणकाची निर्मिती केली. 


अतिशय कार्यक्षम संगणक बनवायचे असे त्यांचे एक स्वप्न होते. अभियांत्रिकेचे शिक्षण घेत असतानाच त्यांना अशा यंत्राबद्दल वेध लागले होते, की जेणेकरून आकडेमोड ही सोपी होईल. पदवीनंतर, झुसे यांनी फोर्ड मोटर कंपनीसाठी काम केले. जाहिरातींच्या डिझाईन मध्ये त्यांनी आपल्या कलात्मक कौशल्याचा वापर केला.  बर्लिन जवळ शॉनफेल्ड येथे हेन्शेल येथे विमान कारखान्यात डिझाइन अभियंता म्हणून काम करताना त्यांना नेहमी गणना करताना आकडेमोड करावी लागायची. हे काम त्यांना सारखे कंटाळवाणे वाटायचे, आणि यामूळेच त्यांना संगणक निर्मितीचा ध्यास लागला.


 १९६७ मध्ये झुसे यांनी सिद्धांत मांडला कि, ब्रह्मांड स्वतः सेल्युलर ऑटोमॅटॉन किंवा तत्सम संगणकीय संरचना (डिजिटल भौतिकशास्त्र) वर कार्यरत आहे; १९६९  मध्ये त्यांनी 'रेचेन्डर रॅम' (इंग्रजीमध्ये “कॅल्क्युलेटिंग स्पेस”  म्हणून भाषांतरित) पुस्तक प्रकाशित केले .


Comments