आता चंद्रावरही उगवू शकते मुळ्यासारखी भाजी...
![]() |
| स्त्रोत:नासा |
भविष्यात माणसाने चंद्रावर वस्ती केली, तर तो तिथे आपले अन्न पिकवू शकतो का ? याबद्दल महत्वाचे संशोधन नासा मध्ये चालू आहे, आणि त्यांना बऱ्यापैकी यश देखील मिळाले. असाच प्रयत्न नासा संशोधक मॅक्स कोलमन यांनी केला. सद्या कोविड १९ महामारीचे संकट असल्यामुळे बहुतेक देशात लॉकडाऊनसारखी स्थिती आहे. अमेरिकेसारख्या देशात पण असेच संकट असताना, आणि काही शहरांमध्ये लॉकडाऊन असल्यामुळे त्यांनी हा प्रयोग घरीच करण्यास पसंत केला.
चंद्रावर वातावरण नाही, त्यामुळे तिथे प्राणी किंव्हा वनस्पती जिवंत राहू शकत नाही, आणि हेच एक मोठे आव्हान आहे. मॅक्स कोलमन यांचा प्रयोग हा पुढील संशोधनाला दिशा देणारा आहे. कोलमन यांनी यासाठी वाळवंटातील रेती, टीशू पेपर, मुळा (जी आपण भाजीसाठी वापरतो) यांचा वापर प्रयोग करण्यासाठी केला.
कोलमनन यांनी टीशू चे छोटे तुकडे कापले, पाणी घालून ते कंटेनरमध्ये भरले. मुळ्याची तीन दाणे अर्ध्या इंचाच्या खोलीवर कंटेनरमध्ये पेरले. त्यातील एकाला फक्त अंकुर फुटला. नंतर कोलमनन यांनी टीशू चे तुकडे काढले आणि वाळूचा वापर केला. यावेळी त्यांनी चार डब्यांच्या कंटेनरमध्ये वापरायला सुरुवात केली. त्याने चार विभागात वेगवेगळ्या प्रमाणात पाणी ठेवले. यावेळी आलेला परिणाम खरच समाधानकारक होता. सर्वात कमीतकमी पाण्याबरोबर असलेल्या मुळ्याची वाढ ही लवकर झाली.
या प्रयोगाबद्दल कोलेमन म्हणाले कि," जर आपण चंद्रावर पोहोचलो तर आपण पाणी आणि चंद्राच्या मातीचे प्रयोग करू शकतो .” चंद्रावर पाणी आणि ऑक्सिजन मिळणे मुश्कील आहे, त्यामुळे तिथे उपलब्द असलेल्या साधनांचा वापर करणे नक्कीच फायदेशीर होऊ शकते. चंद्रावरील माती यासाठी उपयुक्त ठरेल. राहिला प्रश्न पाणी आणि ऑक्सिजन चा, तर त्यासाठी कृत्रिम चेंम्बर बनवावे लागतील, आणि कृत्रिम वातावरण निर्मिती करावी लागेल.
मानव हा प्रगतीच्या उंबरठ्यावर आहे, आणि हे संशोधन पुढील अंतराळवीर प्रवासासाठी मार्गदर्शक ठरेल हे नक्कीच!

Comments
Post a Comment