जगातील सर्वात मोठी आणि प्रसिद्ध धरणे
थ्री गॉर्जेस धरण
हे धरण चीन मध्ये असून हुबेई प्रांतांत यागंस्ते नदीवर स्थित आहे. हे धरण बांधताना जगातील अत्युच्च अशा तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. हा चीन मधील सर्वात मोठा प्रकल्प असून इथे २२५०० मेगावॉट वीज निर्माण करण्याची क्षमता आहे. 22.5 बिलीयन डॉलर हे धरण बांधण्यासाठी खर्च आला.
इटापी धरण
हे धरण ब्राझील-पराग्वे सीमेवर असून हे जगातील दुसर्या क्रमांकाचे धरण आहे. १४००० मेगावॉट वीज निर्माण करण्याची या धरणाची क्षमता आहे. १९८४ मध्ये अधिकृत पणे हे धरण चालू करण्यात आले. 2016 मध्ये या धरणातून विश्वविक्रमी १०३,०९८, ३६६ मेगावॉट वीज निर्मिती झाली होती.
झिलुडू धरण:
हे चीन मधील दोन क्रमांकाचे धरण असून जलविद्युत निर्माण करण्यात जगात तिसरा क्रमांक लागतो. ९३७ फूट उंचीच्या (२५५.५) मीटर उंचीच्या या धरणाचा उंचीच्या बाबतीत जगात चौथा क्रमांक लागतो. युनान प्रांतातील जिन्शा नदीवर वसलेल्या या धरणातून १६८६० मेगावॉट वीज निर्मिती होते.
गुरी धरण:
हे व्हेनेझुएला येथे स्थित असून जगातील प्रसिद्ध अशा धरणापैकी आहे. सायमन बोलिवार धरण म्हणूनही ओळखले जाणारे, गुरी धरण व्हेनेझुएलाच्या बोलिव्हार राज्यात येते. 1963 मध्ये याचे बांधकाम सुरू करण्यात झाले आणि त्याची क्षमता १७५० मेगावॅट इतकी असून १९७८ पर्यंत २०६५ मेगावॅट क्षमतेचा सोयीसाठी धरण नुतनीकरण करण्यात आले.
टुकुरु धरण
हे धरण ब्राझील मध्ये अॅमेझॉन नदीवर बांधण्यात आले असून हा त्या देशातील पहिलाच जलविद्युत प्रकल्प आहे. १९७५मध्ये धरण बांधायला सुरुवात झाली आणि २०१२ मध्ये प्रकल्प अधिकृत पणे पूर्ण झाला. धरणाची क्षमता ८३७० मेगावॅट असून १३ दशलक्ष लोकांना वीजपुरवठा होऊ शकला.
हूवर धरणः
अमेरिकेच्या सर्वात प्रसिद्ध धरणांपैकी एक. अमेरिकेच्या नेवाडा प्रांतातअसलेले हूवर धरण हे जगातील सर्वात प्रसिद्ध धरण आहे. हे ठिकाण पर्यटकांचे पण एक लोकप्रिय आकर्षण आहे. 20 व्या शतकामधील अभियांत्रिकीचे एक आश्चर्य मानले जाते.
धरणाची क्षमता २०८० मेगावॅट आहे. दीर्घकाळ दुष्काळ आणि कोलोरॅडो नदीतून पाण्याची वाढती मागणी यामुळे धरणातील पाण्याची पातळी कमी होत असल्यामुळे, भविष्यात वीज निर्मितीवर मोठा परिणाम होणार आहे.
ग्रँड इथिओपियन रिनायसांस हा आफ्रिकेतील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प असून तो सध्या निर्माणाधीन आहे.
पूर्ण झाल्यावर अंदाजे याची वीज निर्माण क्षमता 6,450 मेगावॅट असेल. बांधकाम पूर्ण होत आले असले, तरी पूर्ण जलाशय भरण्यास अतिरिक्त 5 ते 15 वर्षे लागतील.
क्रास्नोयार्स्क धरण,रशिया
6,000 मेगावाट क्षमतेसह आज जगातील पहिल्या दहा सर्वात शक्तिशाली धरणांपैकी हे एक धरण आहे. हे रशियाच्या डिव्होनॉर्स्कम मध्ये स्थित आहे. ह्या धरणाचे चित्र १० रूबल च्या नोटेवरही दिसूंन येते. या धरणाचा प्रत्यक्षात त्या प्रदेशाच्या हवामानावरही परिणाम दिसून झाला आहे, कारण वर्षभर वाहते पाणी सोडल्यामुळे हिवाळ्यात नदीला गोठण्यापासून प्रतिबंधित करते.
टिहरी धरण
टिहरी धरण हे भारतातील सर्वात मोठे धरण आणि जगातील चौथ्या क्रमांकाचे मोठ्या उंचीचे धरण आहे. हे सुमारे २६०.५ मीटर उंच आणि ५९२ मीटर लांबीचे आहे. सिंचन आणि जलविद्युत या धरणाचा उपयौग होतो.हे उत्तराखंडच्या टिहरी जिल्ह्यात स्थित आहे. येथे भूमिगत पॉवर हाऊसचे चार टर्बाइन / जनरेटर आहेत. प्रत्येकी 250 मेगावॅटचे सेट एकूण 1000 मेगावॅट क्षमतेची वीज निर्मिती करतात.
भाक्रा नांगल धरण
सरदार सरोवर धरण
हा गुजरातमधील पवित्र नर्मदा नदीवर बांधण्यात येत असलेला मोठा प्रकल्प आहे. याची उंची १६३ मीटर असून तो सरदार सरोवर या नावाने पण ओळखला जातो. या प्रकल्पातून कच्छ आणि सौराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांना सिंचनाची संधी मिळणार आहे. १४५० मेगावॅट वीज निर्माण करण्याची क्षमता या धरणामध्ये आहे.












Comments
Post a Comment