Posts

Showing posts from March 5, 2025

डॉ. सायरस पूनावाला, भारतीय आरोग्य क्षेत्राला वळण देणार व्यक्तीमत्व….

Image
  डॉ. सायरस पूनावाला, पुण्यातील नाहीतर देशातील एक प्रसिद्ध व्यक्तीमत्व. “Vaccine King of India” या नावाने सुद्धा त्यांना ओळखले जाते. १९४१ मध्ये जन्मलेले डॉ. सायरस पूनावाला हे यशस्वी पारसी बिझनेस मॅन आहेत. ‘ सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ’  या कंपनीचे चेअरमन आहेत. जी कंपनी बालचिकिस्ता संबंधित लसी बनवते. १६५ देशात लसी निर्यात केल्या जातात आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे दोन बालकांपैकी एका बालकाला देण्यात येणारी लस ही सिरम इन्स्टिट्यूट मधून बनवलेली असते. डॉ. सायरस पूनावाला यांचा सिरम इन्स्टिट्यूट पर्यंतचा प्रवास मोठा रंजक आहे. यांचा मुळचा धंदा घोडे पाळण्याचा, म्हणजे स्टड फार्मचा. ब्रिटीशांच्या काळात घोड्यांच्या शर्यती खूप चालत, त्यामुळे उत्तोमत्तोम घोड्यांची पैदास डॉ. पूनावाला यांच्या स्टड फार्म मध्ये व्हायची. ब्रिटीशांचे राज्य गेले, आणि घोड्यांच्या शर्यती मध्ये मंदी आली. स्वाभाविकच धंदा डबघाईला आला. एवढ्या घोड्यांना जोपासण, हे जोखमीच आणि खर्चिक काम होत. पण नियतीला काही वेगळच मान्य होत. शर्यतीतून बाद झालेले घोडे डॉ. पूनावाला मुंबईतील हाफकिन या संस्थेला दान करायचे. येथे निरनिराळ्या रोगा...