संगणकाचा शोध आणि महान शास्त्रज्ञ कोनराड झुसे
स्त्रोत:विकीपिडिया संगणक ही आज एकविसाव्या शतकातील एक महत्वाची गरजेची वस्तू आहे. अगदी घरापासून ते मोठ्या औद्योगिक आस्थापनापर्यन्त याचा उपयोग होत आहे. संगणकाची निर्मिती ही काही एका टप्प्यात झाली नाही, त्याला बराच वेळ लागला. बहुतेक शोध हे पहिल्या आणि दुसरया महायुद्धाच्या काळातच लागले. यावेळी शास्त्रज्ञांना सुद्धा अडथळे पार करावे लागले. वित्तपुरवठा न होणे किंव्हा जागतिक युद्धजन्य परिस्थिती यामूळे नवीन संशोधनामध्ये बरेच अडथळे येत होते. अशाच वेळी कोनराड झुसे या जर्मन शास्त्रज्ञाने संगणक निर्मिती साठी संशोधन चालू केले. हे एक जर्मन सिव्हिल इंजिनियर, संगणक वैज्ञानिक आणि उद्योजक होते. जगातील पहिला प्रोग्राम करण्यायोग्य संगणक हा त्यांनीच बनविला. The functional program-controlled Turing-complete Z3 हा त्यांनी 3 मे १९४१ रोजी कार्यरत केला. स्त्रोत:विकीपिडिया: Z1 संगणकाची प्रतिकृती, जी आता बर्लिन येथे संग्रहालयामध्ये आहे. विशेष नोंद करण्यासारखी बाब म्हणजे त्यांनी S2 प्रक्रिया नियंत्रण (Process Control) संगणकाची निर्मिती केली. १९४१ मध्ये त्यांनी Z4 ह्या व्यावसायिक संगणकाची निर्...