'फ्लाइंग कार'; स्कायड्राईव्ह कंपनीची, एका व्यक्तीसह यशस्वी चाचणी.........


आकाशात तुम्ही जर कार उडविण्याचे स्वप्न पाहत असाल, तर ते स्वप्न न राहता आता प्रत्यक्षात उतरणार आहे. अनेक वर्षापासून यावर संशोधन चालू होते, आणि याचा पहिला सफलपूर्वक प्रयोग जपान येथे झाला आहे. जपानच्या स्कायड्राईव्ह कंपनीने, एका व्यक्तीसह यशस्वी चाचणी उड्डाण केले आहे. शुक्रवारी पत्रकारांना यासंदर्भात विडिओ दाखविण्यात आला, प्रोपेलर्ससह चपळ मोटरसायकलसारखे दिसणारे एक विमान जमिनीपासून काही फूट (1-2 मीटर) वर चालविण्यात आले. ४ मिनिटे बंद जाळीमध्ये याचा प्रयोग करण्यात आला.

स्कायड्राईव्ह प्रयत्नाचे प्रमुख असलेले ओमोहिरो फुकुझावा म्हणाले की, २०२३ पर्यंत "फ्लाइंग कार" चे स्वप्न प्रत्यक्षात उतरू शकते. ते सुरक्षित करणे हे पण तितकेच गरजेचे आणि महत्वाचे आहे. आतापर्यत जगात १०० पेक्षा जास्त फ्लाइंग कार चे प्रयत्न चालू आहेत, पण स्कायड्राईव्हचा हा एका माणसाला बसून उडण्याचा प्रयन्त सफल झालेला आहे.

ईव्हीटीओएल किंवा "इलेक्ट्रिक वर्टिकल टेकऑफ आणि लँडिंग" यासारखी वाहने पॉईंट-टू-पॉईंट वैयक्तिक प्रवासासाठी योग्य आहेत. कमी जागेत ही "फ्लाइंग कार" उड्डाण आणि उतरू शकते. शहरातील वाहतूक कोंडी चा सामना करावा लागणार नाही, आणि स्वयंचलित यत्रणेमुळे पायलट ची गरज भासणार नाही.

परिपूर्ण बॅटरी, एअर ट्रॅफिक कंट्रोल आणि इतर पायाभूत सुविधांमुळे त्यांचे व्यावसायिकरण होण्याची अनेक संभाव्य आव्हाने आहेत. पण, आगामी काळात बदलत्या तंत्रज्ञानामुळे यावर मात करून प्रगत अशी "फ्लाइंग कार" आपल्याला आकाशात फिरताना दिसेल.



तुम्हाला हा लेख कसा वाटला?, हे आम्हाला जरूर कळवा. अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक  पेज  Vedh Vishwacha ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी Whatsapp ला क्लिक करा. 

Comments

Popular posts from this blog

संगणकाचा शोध आणि महान शास्त्रज्ञ कोनराड झुसे