गोष्ट एका 2५६ वर्षे जगलेल्या माणसाची….
स्त्रोत:विकीपिडिया चीन आपल्या वैविध्य पूर्ण निसर्ग, इतिहास, कला, मार्शल आर्ट आणि रहस्यमय औषधी वनस्पतींसाठी प्रसिद्ध आहे.आम्ही इतिहासामध्ये घडलेल्या अशाच एका आश्चर्यजनक बातमीबद्दल सांगणार आहोत,जी बातमी आहे चीन मधील, आणि एका २५६ वर्षे जगलेल्या माणसाची. ही कथा तुम्हाला काल्पनिक वाटेल, पण ही एक सत्यकथा आहे. आपल्या माहिती प्रमाणे तर सामान्य माणसाचे आयुष्य आहे ७५ ते ८५ वर्ष, आणि कोण जास्तीच जास्त जगला तर १०० वर्ष. ली चिंग युएन हा माणूस २५६ वर्ष जगला होता. यांचा जन्म इ.स. १७३७ रोजी सिचुआन या चीन मधील दक्षिण प्रांतामध्ये झाला, पण काही विवादित नोंदीमध्ये तो १६७७ असा आहे. निश्चित जन्मतारीखेविषयी सबळ पुरावा नसल्यामुळे इंटरनेट वर मात्र ही एक अफवाच आहे, पण यांच्याविषयी असलेल्या काही नोंदी डावलून चालणार नाही. औषधी वनस्पतीमध्ये जाणकार असलेल्या ली चिंग युएन यांनी आपले आयुष्य पर्वतामध्ये औषधे गोळा करण्यामध्ये घालविले आणि ते या विषयामध्ये निष्णान्त होते. ची कुंग या चीनमधील शेकडो वर्षापूर्वीच्या योगा मध्ये पण त्यांनी अभ्यास केला होता. गांसू, शांक्सी, वियतनाम, थाईलैंड, मंचूरिया, आणि ति...