गोष्ट एका 2५६ वर्षे जगलेल्या माणसाची….

स्त्रोत:विकीपिडिया



चीन आपल्या वैविध्य पूर्ण निसर्ग, इतिहास, कला, मार्शल आर्ट आणि रहस्यमय औषधी वनस्पतींसाठी प्रसिद्ध आहे.आम्ही इतिहासामध्ये घडलेल्या अशाच एका आश्चर्यजनक बातमीबद्दल सांगणार आहोत,जी बातमी आहे चीन मधील, आणि एका २५६ वर्षे जगलेल्या माणसाची. 


ही  कथा तुम्हाला काल्पनिक वाटेल, पण ही एक सत्यकथा आहे. आपल्या माहिती प्रमाणे तर सामान्य माणसाचे आयुष्य आहे ७५  ते ८५ वर्ष, आणि कोण जास्तीच जास्त जगला तर १०० वर्ष. ली चिंग युएन हा माणूस २५६ वर्ष जगला होता. यांचा जन्म इ.स. १७३७ रोजी सिचुआन या चीन मधील दक्षिण प्रांतामध्ये झाला, पण काही विवादित नोंदीमध्ये तो १६७७ असा आहे. निश्चित जन्मतारीखेविषयी सबळ पुरावा नसल्यामुळे इंटरनेट वर मात्र ही एक अफवाच आहे, पण यांच्याविषयी असलेल्या काही नोंदी डावलून चालणार नाही.


औषधी वनस्पतीमध्ये जाणकार असलेल्या ली चिंग युएन यांनी आपले आयुष्य पर्वतामध्ये औषधे गोळा करण्यामध्ये घालविले आणि ते या विषयामध्ये निष्णान्त होते. ची कुंग या चीनमधील शेकडो वर्षापूर्वीच्या योगा मध्ये पण त्यांनी अभ्यास केला होता. गांसू, शांक्सी, वियतनाम, थाईलैंड, मंचूरिया, आणि तिबेट येथे त्यांनी पारंपारिक औषधे गोळा आणि अभ्यास करण्यासाठी प्रवास केला. असे मानले गेले की, वयाच्या ७२ व्या वर्षी १९४९ मध्ये त्यांनी प्रांतीय कमांडर-इन-चीफ येयूह जोंग च्य यांच्या सैन्यात सैन्य दलाचे शिक्षक आणि रणनीतिकारक सल्लागार म्हणून रुजू झाले.


चेंगदू युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक वू चुंग-चिह यांच्या म्हणण्यानुसार लीचा जन्म १६७७ मध्ये झाला. यासाठी त्यांनी न्यूयॉर्क टाइम्स मध्ये १९३० साली प्रसिद्ध झालेल्या लेखाचा संदर्भ घेतला. त्यांनी जुन्या नोंदी शोधल्या आणि त्यांना असे आढळून आले की, इम्पीरियल चीनी सरकारने त्यांना १८२७ मध्ये १५० वर्ष आणि १८७७ मध्ये २०० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या होत्या. न्यूयॉर्क टाइम्सच्या वार्ताहराने लिहिले होते की, ली चिंग युएन यांचे शेजारी  म्हणत, “त्यांचे आजोबा जेव्हा लहान होते तेंव्हा त्यांनी ली यांना पाहिलं होत, आणि ते त्यावेळी एक प्रौढ माणूस होते ”.


आहार आणि तंदुरुस्ती बाबतीत ली चिंग युएन काटेकोर होते. वनौषधी मध्ये ते जाणकार होते. मार्शल आर्ट आणि ची कुंग या शेकडो वर्षापूर्वीच्या योगा मध्ये त्यांचा अभ्यास दांडगा होता. यामुळेच त्यांनी एवढ्या दीर्घ आयुष्याचा पल्ला गाठला. त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात २३ वेळा विवाह केला आणि त्यांना २०० मुले होती. ६ मे १९३३ व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला आणि त्याचे वय २५६ वर्ष होते. यावेळी त्यांची २४ वी बायको जिवंत होती आणि तिचे वय ६० वर्षे होते. “A Factual Account of the 250 Year-Old Good-Luck Man”  नावाने रिपोर्ट ही यांग सेन या National Revolutionary Army च्या जनरल ने प्रकाशीत केला होता.


 "Tortoise-Pigeon-Dog" या टाईम वृत्तपत्रात १५ में १९३३ रोजी प्रकाशीत झालेल्या लेखामध्ये त्यांनी आपल्या दीर्घ आयुष्याबद्दल सांगितले होते. मन शांत ठेवा, कबुतराप्रमाणे चाला, कासवासारख बसा, आणि कुत्र्यासारख झोपा. हाच त्यांच्या दीर्घ आयुष्याचा मंत्र ठरला होता.

Comments

  1. अप्रतिम लेख! खरंच आश्चर्यजनक गोष्ट

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

संगणकाचा शोध आणि महान शास्त्रज्ञ कोनराड झुसे