आता चंद्रावरही उगवू शकते मुळ्यासारखी भाजी...
स्त्रोत:नासा चंद्राकडे मानव नेहमीच एक आश्चर्य म्हणून पाहत आला आहे, आणि भविष्यात तिथे मानव वस्ती करू शकतो का ,याबद्दल नासा सारखी संस्था संशोधन पण करीत आहे. १६ जुलै १९६९ च्या मोहिमेमध्ये नील आर्मस्ट्रॉंग सारखे अंतराळवीर चंद्रावर पण पोहोचले , आणि अंतराळ क्षेत्रात मानवाने एक प्रगतीचे पाऊल टाकले. भविष्यात माणसाने चंद्रावर वस्ती केली, तर तो तिथे आपले अन्न पिकवू शकतो का ? याबद्दल महत्वाचे संशोधन नासा मध्ये चालू आहे, आणि त्यांना बऱ्यापैकी यश देखील मिळाले. असाच प्रयत्न नासा संशोधक मॅक्स कोलमन यांनी केला. सद्या कोविड १९ महामारीचे संकट असल्यामुळे बहुतेक देशात लॉकडाऊनसारखी स्थिती आहे. अमेरिकेसारख्या देशात पण असेच संकट असताना, आणि काही शहरांमध्ये लॉकडाऊन असल्यामुळे त्यांनी हा प्रयोग घरीच करण्यास पसंत केला. चंद्रावर वातावरण नाही, त्यामुळे तिथे प्राणी किंव्हा वनस्पती जिवंत राहू शकत नाही, आणि हेच एक मोठे आव्हान आहे. मॅक्स कोलमन यांचा प्रयोग हा पुढील संशोधनाला दिशा देणारा आहे. कोलमन यांनी यासाठी वाळवंटातील रेती, टीशू पेपर, मुळा (जी आपण भाजीसाठी वापरतो) यांचा वापर प्रयोग करण्यासाठी केला...