Posts

Showing posts from March, 2025

७ डिग्री सेल्सिअस पर्यंत वाढू शकते जागतिक तापमान....

Image
जागतिक तापमान वाढीचे परिणाम आता हिमालय आणि त्याच्या सभोवतालच्या राज्यात दिसून येत आहेत. नुकत्याच ‘जलवायु परिवर्तन’ या पत्रिकेत प्रकाशीत झालेल्या वृत्तानुसार या २१ व्या शतकाच्या शेवटी जम्मू काश्मीर आणि लद्दाख येथे तापमान ६.९ डिग्री सेल्सिअस पर्यंत वाढू शकते, त्याचा परिणाम येथील ग्लेशिअर वर होऊन ते ८५ टक्क्यापर्यंत वितळू शकतात. काश्मीर विद्यालयाचे कुलगुरु आणि या शोधाचे प्रमुख प्रो. शकील अहमद रोम्शू यांच्या म्हणण्यानुसार हिमालयातील बहुतेक प्रदेशांना याच फटका बसणार आहे. यामध्ये जम्मू-काश्मीर, लद्दाख,गिलगित बाल्टिस्तान, अक्साई चिन आणि जवळचा प्रदेश यांचा पण समावेश आहे. सरासरी वार्षिक तापमानामध्ये ४.५ डिग्री, 3.९८ डिग्री आणि क्रमश: तीन टप्प्यात तापमान वाढेल आणि ते शतकाच्या अंतापर्यंत ६.९३ डिग्री सेल्सियस वाढण्याची शक्यता आहे जगामध्ये ग्लोबल वार्मिंग चे गंभीर परिणाम दिसून येत असून सरासरी वैश्विक तापमान ५ डिग्री पर्यंत वाढेल आणि भारतामध्ये तेच सरासरी ४.४ पर्यंत वाढू शकते. जम्मू-काश्मिरमध्ये हेच सरासरी प्रमाण जास्तच असेल. ग्रीनहाउस गॅस उत्सर्जन हे पण तापमान वाढीचे मुख्य कारण आहे. होणारे ...

डॉ. सायरस पूनावाला, भारतीय आरोग्य क्षेत्राला वळण देणार व्यक्तीमत्व….

Image
  डॉ. सायरस पूनावाला, पुण्यातील नाहीतर देशातील एक प्रसिद्ध व्यक्तीमत्व. “Vaccine King of India” या नावाने सुद्धा त्यांना ओळखले जाते. १९४१ मध्ये जन्मलेले डॉ. सायरस पूनावाला हे यशस्वी पारसी बिझनेस मॅन आहेत. ‘ सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ’  या कंपनीचे चेअरमन आहेत. जी कंपनी बालचिकिस्ता संबंधित लसी बनवते. १६५ देशात लसी निर्यात केल्या जातात आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे दोन बालकांपैकी एका बालकाला देण्यात येणारी लस ही सिरम इन्स्टिट्यूट मधून बनवलेली असते. डॉ. सायरस पूनावाला यांचा सिरम इन्स्टिट्यूट पर्यंतचा प्रवास मोठा रंजक आहे. यांचा मुळचा धंदा घोडे पाळण्याचा, म्हणजे स्टड फार्मचा. ब्रिटीशांच्या काळात घोड्यांच्या शर्यती खूप चालत, त्यामुळे उत्तोमत्तोम घोड्यांची पैदास डॉ. पूनावाला यांच्या स्टड फार्म मध्ये व्हायची. ब्रिटीशांचे राज्य गेले, आणि घोड्यांच्या शर्यती मध्ये मंदी आली. स्वाभाविकच धंदा डबघाईला आला. एवढ्या घोड्यांना जोपासण, हे जोखमीच आणि खर्चिक काम होत. पण नियतीला काही वेगळच मान्य होत. शर्यतीतून बाद झालेले घोडे डॉ. पूनावाला मुंबईतील हाफकिन या संस्थेला दान करायचे. येथे निरनिराळ्या रोगा...