कॅनडामध्ये का दुभंगला मिलेन हिमतट...
ग्लोबल वार्मिंग आणि जागतिक तापमान वाढीचे परिणाम आता जगासमोर दिसू लागले आहेत. अतिवृष्टी, पूर दुष्काळ आणि समुद्रपातळी मध्ये होणारी होणारी वाढ ही यापैकीच काही उदाहरणे दिसून आली आहेत.
जागतिक तापमान दुष्परिणाम किती भयंकर असू शकतात याचेच एक उदाहरण कॅनडा सारख्या देशात दिसून आले. जगातील सर्वात मोठा आइस शेल्फ ( Ice Shelf), हिमतट, जो समुद्राच्या पाण्यावर बर्फाच्या ग्लेशिअर मुळे बनतो, त्यालाच आता तडे गेले.
४००० वर्ष जुना कॅनडा मधील मिलेन हिमतट दुभंगला असून त्याचे दोन तुकडे झाले आहेत. काही लहान तुकड्यात विभागले आहेत तर काही मोठ्या तुकड्यात. सर्वात मोठ्या तुकड्याचा आकार हा ५५ चौरस किलोमीटर आणि ११.५ किलोमीटर लांब आहे.
१८७ चौरस किलोमीटर आकाराचा हा हिमतट आता आकाराने १०६ चौरस किलोमीटर आहे. आकाराने जगात सर्वात मोठा असलेला हा हिमतट जगातील पर्यावरणाच्या दृष्टीने एक महत्वाचा भाग होता. या परीसरातील वाढते तापमान याला कारणीभूत ठरले. या परिसरातील तापमान हे जुलै, ऑगस्ट च्या दरम्याने ५ डिग्री सेल्सिअस ने वाढले जे १९८० च्या पेक्षा जास्तच होत.
कॅनडाच्या नुनावुत प्रदेशातील एलेस्मेरी बेटाच्या उत्तर किनारपट्टीवरील हिमतट आणि ग्लेशिअर गेल्या दशकापासून वितळत चालले असून जागतिक पर्यवारणाचा समतोल बिघडत चालला आहे. येणाऱ्या काळात समुद्राच्या पातळीत वाढ, पूर, अतिवृष्टी या सारख्या परिणामांना सामोरे जावे लागेल आणि होणारे परिणाम देखील भयावह असतील.

Comments
Post a Comment