डॉ. सायरस पूनावाला, भारतीय आरोग्य क्षेत्राला वळण देणार व्यक्तीमत्व….

 

डॉ. सायरस पूनावाला, पुण्यातील नाहीतर देशातील एक प्रसिद्ध व्यक्तीमत्व. “Vaccine King of India” या नावाने सुद्धा त्यांना ओळखले जाते. १९४१ मध्ये जन्मलेले डॉ. सायरस पूनावाला हे यशस्वी पारसी बिझनेस मॅन आहेत. ‘ सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ’  या कंपनीचे चेअरमन आहेत. जी कंपनी बालचिकिस्ता संबंधित लसी बनवते. १६५ देशात लसी निर्यात केल्या जातात आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे दोन बालकांपैकी एका बालकाला देण्यात येणारी लस ही सिरम इन्स्टिट्यूट मधून बनवलेली असते.

डॉ. सायरस पूनावाला यांचा सिरम इन्स्टिट्यूट पर्यंतचा प्रवास मोठा रंजक आहे. यांचा मुळचा धंदा घोडे पाळण्याचा, म्हणजे स्टड फार्मचा. ब्रिटीशांच्या काळात घोड्यांच्या शर्यती खूप चालत, त्यामुळे उत्तोमत्तोम घोड्यांची पैदास डॉ. पूनावाला यांच्या स्टड फार्म मध्ये व्हायची. ब्रिटीशांचे राज्य गेले, आणि घोड्यांच्या शर्यती मध्ये मंदी आली. स्वाभाविकच धंदा डबघाईला आला. एवढ्या घोड्यांना जोपासण, हे जोखमीच आणि खर्चिक काम होत. पण नियतीला काही वेगळच मान्य होत.

शर्यतीतून बाद झालेले घोडे डॉ. पूनावाला मुंबईतील हाफकिन या संस्थेला दान करायचे. येथे निरनिराळ्या रोगांवर लसी बनविण्याचे काम होई. यासाठी ते  घोड्यांचा वापर करीत. डॉ. पूनावाला यांच्या डोक्यात एक विचार आला. त्यांचे उद्योगी मन शांत बसू देईना. त्यांनी याचे रहस्य हाफकिनच्या पशुवैद्यकीय डॉक्टर कडून जाणून घेतलं आणि ‘सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ या संस्थेचा जन्म झाला. घोड्यांच्या रक्तापासून अँटिटॉक्सिन करण्याच्या उद्योगाला नवीन विज्ञानाची जोड मिळाली. १९७४मध्ये घटसर्पाची लस तयार करण्यात आली. १९८१ साली सर्पदंशावरील लस बनविण्यात आली. डांग्या खोकल्या सारख्या आजारावर पण औषध बनविण्यात आलं. आज १६५ पेक्षा जास्त देशांत या लसींची निर्यात होते.

२०१९ च्या हुरून ग्लोबल रिच लीस्ट नुसार, डॉ. सायरस पूनावाला हे भारतामध्ये चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती होते, आणि जगात शंभरावा नंबर होता. त्यांची एकूण संपत्ती १३ अब्ज डॉलर्स पर्यंत पोहचली आहे. २००९ साली त्यांना पद्मश्री या भारतातील सर्वोच्च पुरस्काराने गौरविण्यात आले. आज सिरम इन्स्टिट्यूट मध्ये वर्षाला दीड अब्ज लसी निर्माण होऊ शकतात. गोवर, पोलिओ आणि फ्लू सारख्या रोगांची लस येथेच निर्माण होते. डॉ. पूनावाला यांचा उद्योग परदेशात पण पसरला असून बिल्थोव्हेन बायोलॉजिकल या डच कंपनीमध्ये व नॅनोथेरपीटिक्स या अमेरिकन कंपनीमध्ये मालकी हक्क आहेत. कोविड १९ सारख्या नवीन रोगावर येथे संशोधन चालू असून नवीन लस बाजारात आणायच्या तयारीत सिरम इन्स्टिट्यूट आहे.


Comments

  1. अभ्यासपूर्ण लेख.आणि डॉ.सायरस पूनावाला यांच्याबद्दल अधिक विस्ताराने माहिती दिल्याबद्दल धन्यवाद!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

संगणकाचा शोध आणि महान शास्त्रज्ञ कोनराड झुसे