७ डिग्री सेल्सिअस पर्यंत वाढू शकते जागतिक तापमान....


जागतिक तापमान वाढीचे परिणाम आता हिमालय आणि त्याच्या सभोवतालच्या राज्यात दिसून येत आहेत. नुकत्याच ‘जलवायु परिवर्तन’ या पत्रिकेत प्रकाशीत झालेल्या वृत्तानुसार या २१ व्या शतकाच्या शेवटी जम्मू काश्मीर आणि लद्दाख येथे तापमान ६.९ डिग्री सेल्सिअस पर्यंत वाढू शकते, त्याचा परिणाम येथील ग्लेशिअर वर होऊन ते ८५ टक्क्यापर्यंत वितळू शकतात.

काश्मीर विद्यालयाचे कुलगुरु आणि या शोधाचे प्रमुख प्रो. शकील अहमद रोम्शू यांच्या म्हणण्यानुसार हिमालयातील बहुतेक प्रदेशांना याच फटका बसणार आहे. यामध्ये जम्मू-काश्मीर, लद्दाख,गिलगित बाल्टिस्तान, अक्साई चिन आणि जवळचा प्रदेश यांचा पण समावेश आहे. सरासरी वार्षिक तापमानामध्ये ४.५ डिग्री, 3.९८ डिग्री आणि क्रमश: तीन टप्प्यात तापमान वाढेल आणि ते शतकाच्या अंतापर्यंत ६.९३ डिग्री सेल्सियस वाढण्याची शक्यता आहे

जगामध्ये ग्लोबल वार्मिंग चे गंभीर परिणाम दिसून येत असून सरासरी वैश्विक तापमान ५ डिग्री पर्यंत वाढेल आणि भारतामध्ये तेच सरासरी ४.४ पर्यंत वाढू शकते. जम्मू-काश्मिरमध्ये हेच सरासरी प्रमाण जास्तच असेल. ग्रीनहाउस गॅस उत्सर्जन हे पण तापमान वाढीचे मुख्य कारण आहे.

होणारे परिणाम.

हिमालयातून बहुतेक नद्यांचा उगम होतो आणि दक्षिण आशियातील देशांत वाहतात. तापमान वाढीमुळे जलस्त्रोतांवर याचा परिणाम होईल. कृषी, पर्यटन क्षेत्रांवर याचे गंभीर परिणाम दिसून येतील. हिमालयातील ग्लेशिअर वितळल्यामुळे काही वेळा पूर स्थिती सारखे परिणाम दिसून येतील. मान्सून वर याचा अप्रत्यक्षपणे परिणाम होईल. हिमालयातील वातावरण हे मान्सून वाऱ्यावर पण परिणाम करत असते. यामूळे नैसर्गिक परीसंस्थेला धोका पोहचेल आणि पर्यावरणाचा समतोल बिघडेल.

Comments

Popular posts from this blog

संगणकाचा शोध आणि महान शास्त्रज्ञ कोनराड झुसे