Viral Video : सायकलिंग करता करता दळणही आणि व्यायामही.......
तुम्ही सकाळी सायकलिंग करत असाल आणि तुम्हाला घरातील धान्य दळता आले तर ! असाच एक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे. ही एक चक्की असून ती सायकलला जोडलेली आहे. या चक्कीवर तुम्ही सायकलिंगही करू शकता आणि धान्य दळता दळता व्यायामही करू शकता.
व्यायाम करण्याच्या सायकलला ही चक्की जोडलेली आहे आणि पॅडल मारल्यावर चक्की आपलं काम करू लागते. चक्कीची यंत्रणा ही पॅडलला जोडलेली आहे. अविनाश शरण या आयएअस अधिकाऱ्याने हा व्हिडिओ शेअर केलेला आहे. “अप्रतिम शोध. काम आणि व्यायाम देखील. कॉमेंट्रीही उत्तम आहे ”, असा कॅप्शनसहीत हा व्हिडिओ अविनाश यांनी शेअर केला आहे.
ग़ज़ब का आविष्कार. काम भी और कसरत भी. कॉमेंट्री भी शानदार. 👌👍
— Awanish Sharan (@AwanishSharan) August 29, 2020
VC: SM pic.twitter.com/Lg3HBCabzo
तुम्हाला हा लेख कसा वाटला?, हे आम्हाला जरूर कळवा. अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज Vedh Vishwacha ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी Whatsapp ला क्लिक करा
Comments
Post a Comment